Saturday 25 February 2017

                   मुलांन सोबतची काही क्षण चित्रे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Tuesday 21 February 2017

एका व सांगा


                    🔹  उपक्रम 🔹
                       ऐका व सांगा.


 ●उद्देश :- तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा
              सांगता येणे.

●सूचना :- सांगितलेली माहिती काळजीपूर्वक
               ऐका व परत सांगा.

●उपक्रमासाठी वापरावयाच्या माहितीचे
  काही नमुने --

 (१)सूर्य सकाळी उगवतो.
     सूर्य संध्याकाळी मावळतो.

 (२)बदक पाण्यात पोहते.
     घार आकाशात उंच उडते.

(३)उन्हाळ्यात कडक ऊन असते.
    हिवाळ्यात थंडी वाजते.

(४)ऊस गोड असतो.
    मिरची तिखट असते.

(५)चिंचेचे पान छोटे असते.
    वडाचे पान मोठे असते.

(६)कापसापासून कापड बनते.
    ऊसापासून साखर बनते.

(७)आपली नखे नियमित कापावीत.
     केस स्वच्छ असावेत.

(८)मेथी,पालक या पालेभाज्या आहेत.
     पालेभाज्या नेहमी खाव्यात.

(९)वाहने रस्त्यावरून धावतात.
    लोक बाजूने चालतात.

(१०)आम्ही बसने शाळेत जातो.
      आम्ही बसने घरी येतो.

(११)आमच्या गावात तलाव आहे.
       तलावात मासे आहेत.

(१२)ही आमची शाळा आहे.
      आम्हाला शाळा खूप आवडते.

(१३)आम्ही दररोज शाळेत येतो.
       आमच्या बाई गोष्टी सांगतात.

(१४)रात्री आकाशात चंद्र दिसतो.
       मुले चांदण्यात खेळतात.

(१५)रात्र संपते, सकाळ होते.
       पाखरांची किलबिल सुरू होते.

(१६)आम्ही सकाळी लवकर उठतो.
       दात स्वच्छ घासून तोंड धुतो.

(१७)अंगणात नळ चालू होता.
       सुप्रियाने नळ बंद केला.

(१८)गावात घरे असतात.
      शहरात उंच इमारती असतात.

(१९)शाळेसमोर आंब्याचे झाड आहे.
       त्याला आंबे लागतात.
      आंबे गोड असतात.

(२०)बाई फळ्यावर लिहितात.
       मी पाटीवर लिहिते.
       दादा वहीवर लिहितो.

  

Monday 20 February 2017

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
        🔹मराठी भाषा समृद्धीसाठी -
             वाक्प्रचारयुक्त तुलना 🔹

   मराठी भाषेत अनेक वाक्प्रचारयुक्त तुलना
आहेत. उदा. कोळशासारखा काळा.या तुलना
बोलताना किंवा लिहिताना योग्य रीतीने वापरल्या
गेल्या,तर भाषेची संपन्नता व्यक्त होते आणि
तुलनाही ठाशीक स्वरूपात केली जाते.
  खाली या प्रकारच्या अनेक वाक्प्रचारयुक्त
तुलना दिल्या आहेत.

(१) सोन्यासारखा पिवळा.

(२) कोळशासारखा काळा.

(३) सिंहासारखा शूर.

(४) काचेसारखा ठिसूळ.

(५) मधमाशीसारखा उद्योगी.

(६) बर्फासारखा थंड.

(७) कोल्ह्यासारखा धूर्त.

(८) सशासारखा चपळ.

(९) वाघासारखा हिंस्र.

(१०) खडकासारखा खंबीर (स्थिर).

(११) हवेसारखा निरंकुश (मुक्त).

(१२) कोकरासारखा गरीब.

(१३) सोन्यासारखा अस्सल.

(१४) हंसासारखा डौलदार.

(१५) न्यायाधीशासारखा गंभीर.

(१६) गवतासारखा हिरवागार.

(१७) गारगोटीसारखा टणक.

(१८) राजाइतका सुखी.

(१९) शिसासारखा जड.

(२०) अग्नीसारखा उष्ण.

(२१) कबुतरासारखा निष्पाप.

(२२) पिसासारखा हलका.

(२३)मेघगर्जनेसारखा मोठा(आवाज).

(२४) माशासारखा मूक.

(२५) खारीसारखा चपळ.

(२६) मोरासारखा गर्विष्ठ.

(२७) विजेसारखा गतिमान(चपळ).

(२८) रक्तासारख लाल.

(२९) चेंडूसारखा गोल.

(३०) घड्याळासारखा नियमित.

(३१) वस्त-यासारखा धारदार.

(३२) लोण्याइतके मऊ.

(३३) मेणासारखे मऊ.

(३४) गोगलगायीसारखा  मंदगतीचा.

(३५) मधासारखे गोड.

(३६) बाणासारखे वेगवान.

(३७) कोंबडीच्या पिलासारखा गरीब.

(३८) सशासारखा भित्रा.

(३९) माकडासारखा चलाख.

(४०) केसासारखा बारीक.

(४१) लोकरीसारखा उबदार

(४२) चंडोल पक्ष्यासारखा आनंदी.

(४३) विहिरीसारखा खोल.

(४४) पुतळ्यासारखा स्तब्ध (मुका).

(४५) चेरीसारखा लाल.

(४६) सुईसारखा तीक्ष्ण.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°